You are currently browsing the tag archive for the 'रातराणी' tag.
रातराणी
तांबुस पीवळ्या तुझ्या स्वप्नांत मी हिरवळ होवुन याव…..
हे शक्य आहे का?
काळजात आषाढघण माळून काळ्यामांतीत तू
वाट बघत- बसावं, आभाळ सजे पर्यन्त
सांग हे शक्य आहे का?
अकराव्या दिशेने वाटणारा गारवा..
तू मंजुळ सरिंनी – भिजवुन टाकावा..
आणि मी अंगणात विखुरलेली स्वप्ने
गोळा करण्याचा प्रयन्त करावा,
रात्र वितळे पर्यन्त!
सांग ना हे शब्द आहे का?
ओझरत्या या सहवासात मी पेरावे हे तळहात
तुझ्या तळहातांवर, काठोकाठ !
आणि तू डोळे बंद करावे माझ्या पाठोपाठ..
सांग आता हे शक्य आहे का?
चांदण्यांची लगबग सुरु होईन पुन्हा,
पुन्हा नवे सुर्य झळकतील..
तू होशील पुन्हा
रातराणी नव्याने!
पण, तुझा गंध माळणारा रानवारा मीच असेन ना?
सांग ना सांग आता हे शक्य आहे का?
- हर्षद खंदारे
http://www.marathimati.com/Aksharmanch/HarshadKhandare/Kavita_8.asp
