You are currently browsing the tag archive for the 'मराठी कविता' tag.
मराठी कविता : http://www.marathimati.com/Aksharmanch/Marathi-Kavita.asp
रातराणी
तांबुस पीवळ्या तुझ्या स्वप्नांत मी हिरवळ होवुन याव…..
हे शक्य आहे का?
काळजात आषाढघण माळून काळ्यामांतीत तू
वाट बघत- बसावं, आभाळ सजे पर्यन्त
सांग हे शक्य आहे का?
अकराव्या दिशेने वाटणारा गारवा..
तू मंजुळ सरिंनी – भिजवुन टाकावा..
आणि मी अंगणात विखुरलेली स्वप्ने
गोळा करण्याचा प्रयन्त करावा,
रात्र वितळे पर्यन्त!
सांग ना हे शब्द आहे का?
ओझरत्या या सहवासात मी पेरावे हे तळहात
तुझ्या तळहातांवर, काठोकाठ !
आणि तू डोळे बंद करावे माझ्या पाठोपाठ..
सांग आता हे शक्य आहे का?
चांदण्यांची लगबग सुरु होईन पुन्हा,
पुन्हा नवे सुर्य झळकतील..
तू होशील पुन्हा
रातराणी नव्याने!
पण, तुझा गंध माळणारा रानवारा मीच असेन ना?
सांग ना सांग आता हे शक्य आहे का?
- हर्षद खंदारे
http://www.marathimati.com/Aksharmanch/HarshadKhandare/Kavita_8.asp
शुभाशुभ मुहूर्ते कधी मानलीच नाही..
कळत-नकळत जे काही रूजत गेलं..
त्याचचं फलीत ते…
कुतुहलाने अंकुरत गेलं…
मातीतुनचं जन्माला आला रंग, संवाद, संवेदनांचा एक भला मोठ्ठा पुंजका…
मनाला मेंदुच्या चाकोरीतून बाहेर काढण्याचे श्रेय पण त्यांनाच..
त्यांनीच जानवु दिला नाही कधी ‘मी’ पणा..
म्हणूनच, पहील्या घंटेपासून-मध्यांतरा पर्यंन्त तरी..
शुन्य होतांनाही शुभाशुभ मुहुर्ते कधी मानलीच नाही…
आणि गोठलेल्या या पांढऱ्या गर्दितही…
निर्मळ-खळखळ वाहण्याचा पारदर्शक जीवनानंद घेता आला…
त्या माझ्या मातीतल्या हिरवळीचे ऋण तिसऱ्या घंटेआधि फेडण्यासाठी…
- हर्षद खंदारे
http://www.marathimati.com/Aksharmanch/HarshadKhandare/Kavita_15.asp
मराठी कविता
अता सर्व काही लिहीणार आहे..
सर्व सर्व.. मातीचा सुगंध दरवळ्णार आहे सर्वत्र..
माझ्या आणि तुमच्याही.



